Skip to main content

असा रवि पुन्हा होणे नाही. रविंद्र भनगडे यांस अखेरची भावपुर्ण श्रद्धांजली

📍पारनेर / भनगडेवाडी
😢निशब्द 💐
असा रवि पुन्हा होणे नाही
💐 रविभाऊला अखेरची भावपुर्ण श्रद्धांजली💐
मनाला न पटणारी घटना
नियतिच्या खेळापुढे आम्ही निशब्द 
रविवार दिनांक २३ रोजी जुन सकाळी धक्कादायक बातमी समोर आली  ९ : ३० वाजता नगर - कल्याण हायवे वरती भनगडेवाडी येथे श्री रविंद्र गुजाभाऊ भनगडे यांचे अपघाती निधन झाले. भनगडेवाडी पंचक्रोशित बातमी समजताच थोडा वेळ हृदय
 अचानक बंद पडल्यासारखे झाले. परीसरातील सुमारे ३००च्या आसपास युवा वर्ग घटनास्थळी जमा झाला. नातेवाईक मित्र परिवार रविंद्र भनगडे यांचे सर्व नातेवाईक जमा झाले. विश्वासच बसेना न घडणारी घटना घडली आणि एकच बातमी समोर आली रविभाऊ काळाच्या पडद्याआड गेला. दुःखाचा डोंगर कोसळला भनगडेवाडीचे माजी सरपंच डॉक्टर राजेश भनगडे हे स्वताः त्यांचा मित्र परिवार माळकूपचे माजी सरपंच श्री बाळासाहेब शिंदे माळकूपचे सरपंच श्री संजय काळे हे घटनास्थळी दाखल झाले. आणि सर्वात महत्वाचे रविभाऊचे मेहुने श्री अभय भिसे कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव हे रविभाऊचे मेन आधारस्तंभ होते. रविभाऊचे मामा डॉक्टर श्री सुरेश भागाजी शिंदे यांनी सुद्धा रविभाऊसाठी खुप प्रयत्न केले. व या सर्वांनी पोलीस प्रशासनास कळविले. व पुढील कार्यवाही तात्काळ केली.
थोडया वेळापुर्वी दिसणारा रविभाऊ अचानक गायब झाला. मनाला खुप मोठा धक्का बसला. रविंद्र भनगडे अतिषय होतकरू, कष्टकरू मनमिळाऊ कर्तापुरुष होता. त्याच्या पाठीमागे पत्नी दोन मुली आई वडील दोन बहिणी एक भाऊ व पुतने नातवंडे असा मोठा परिवार होता. खुप कष्टातून मोठा झाला होता आमचा रविभाऊ सर्व नातेवाईकांच्या मनात अगदी हिऱ्यासारखा बसला होता. रविभाऊ हा माता मळगंगा मातेचा निश्चिम भक्त होता. अनेक वर्षापासून माता मळगंगेची पुजा आरती व यात्रेचे नियोजन पाहत असतानां त्याच्यावरती काळाने झडप घातली. भनगडेवाडी व परीसरात रविभाऊला कोणीही फोन करू द्या सगळ्यांना हातातले काम सोडून उभा राहत असे. रविभाऊचा नातेवाईक मित्र परिवार खुप मोठा आहे. भिसे, शिंदे, भोर,जगताप, बांडे, कोकाटे, आंधळे, फापाळे, हे नातेवाईकांच्या अगदी मोलाच्या व महत्वाच्या ठिकाणी होता. आणि रविवारचा दिवस कायम आमच्या स्मरणात राहील. रविभाऊने अतिषय प्रामाणिकपणे कष्ट करून स्वताःच्या हिमतीवर आपल्या शेतांसाठी ट्रॅक्टर, फोर व्हिलर वॅगेनर गाडी घेतली होती. आणि रविभाऊनी स्वतःची शेती एकदम उत्कृष्ट प्रकारे डेव्हलप केली होती. ती पण अतिषय काबाडकष्ट करून रविभाऊचे जीवणचं अतिषय संघर्षाने चालु झाले. भनगडेवाडीसाठी तेथील युवकांसाठी ग्रामस्थांसाठी खुप मोलाचा वाटा होता. रविभाऊचे दोन मामा माळकूप येथील सुभाष शिंदे व विलास नेव्हे यांच्यावर खुप प्रेम दोन तिन दिवसां मिळून यांच्या गाठी भेटी व फोन खुप प्रेम रवि भाऊचे  
अनेक वर्षापासुन रविभाऊ दुग्ध व्यवसाय करत होता. आजही आमचा विश्वास बसत नाही रविभाऊ आमच्यात नाही. गावातील पंचक्रोशितील नातेवाईक रविंद्र भनगडे यांना प्रेमाणे फक्त आणि फक्त रवि भाऊच म्हणत आईवडीलांसाठी एक हिराच होता. रविभाऊला दोन्ही मुलीच होत्या. एका मुलीच कावेरीच लग्न झाले. आणि दुसरी मुलगी ऋुतुजा तिच पण उच्च शिक्षण चालु आहे. सर्वांसाठी रविभाऊ एक हक्काचा माणुस होता. प्रसंगी धावुन जाणारा अनेकांना मदत करणारा प्रेमळ व तोंडभरून अगदी मायेने बोलणारा रविभाऊ अचानक काळाने नेला. रविभाऊसाठी बोलायला शब्दच उरले नाही. रविभाऊचं नाव डोळ्यासमोर आलं कि डोळ्यातून अचानक पाणी यायला सुरूवात होती. 
रविभाऊ आपल्या कुटुंबासाठी अतिषय प्रामाणिक आणि कष्टकरू कर्ता पुरुष होता. रोजचा रविभाऊचा दिवस फक्त आणि फक्त कष्टाने सुरु व्हायचा. 
रविभाऊला धार्मिक पणाचा खुप नाद होता. 
रविभाऊ सामाजिक धार्मिक क्षेत्रात सर्वात पुढे असायचा. गावात लहानपणापासून ते थोरांपर्यंत अगदी मोलाचा व प्रेमाचा होता. कष्टकरी आयुष्यातून आपल्या जीवणाचा गाडा एकदम सुरळीत पार पाडला होता. आता कुठं रविभाउचं कुटुंब स्थिर व समाधानी झालं होत. त्यात अचानक अस काहीतरी आभाळ फाटल्या सारखं घडलं आणि घडीचा डाव मोडला. काय बोलणार रविभाऊबद्दल शिक्षण जेमतेम झालं. कष्टातून संसार फुलविला आणि होत्याच नव्हतं झालं. 
रविभाऊच्या अंत्यविधीसाठी प्रेम करणारा जनसागर लोटला, रविभाऊसाठी बोलायला शब्दच उरले नाही. म्हणून सर्वच म्हणतात 
असा रविभाऊ होणे नाही. मंगळवारी रविभाऊचा दशक्रिया विधी आहे. रविभाऊला अखेरची श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे 
असा रवि पुन्हा होणे नाही अगदी काळजाला घर करुन गेला. मनात स्मरणात कायम तुझ्या आठवणी राहतील. 
✍️शब्दांकन 
शिवशंकर शिंदे माळकूप 
पारनेर / न्युज एक्सप्रेस 
मायभुमी न्यूज - पत्रकार 
मो नं - 9764972647

Comments

Popular posts from this blog

शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त घट सजावटमध्ये शारदा राजेंद्र रोहोकले यांनी प्रथम क्रमांक मिळविला

🛑 पारनेर - ( प्रतिनिधी )  भाळवणी - पारनेर न्यूज एक्सप्रेस  🔶 शारदीय नवरात्री उत्सवनिमित्त घट सजावट मध्ये शारदा राजेंद्र रोहोकले यांनी प्रथम क्रमांक मिळविला. ✍️ पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे श्री विठ्ठल रुक्मिणी चॅरीटेबल ट्रस्ट भाळवणी स्व.नानापाटील रोहोकले युवा ग्रामविकास प्रतिष्ठान व दोस्ती युवा ग्रुप आयोजित नवरात्री उत्सवानिमित्त घट सजावट मध्ये भाळवणी येथील युवा उद्योजक श्री संतोषशेठ गोविंदराव चेमटे यांची बहीण शारदा राजेंद्र रोहोकले यांनी प्रथम क्रमांक पटकाविल्या बद्दल अहिल्यानगरचे लोकप्रिय खासदार श्री निलेशजी लंके यांच्या पत्नी व जिल्हा परिषद सदस्या सौ राणीताई लंके यांच्या हस्ते पिठाची गिरणी बक्षीस म्हणून देण्यात आली . भाळवणी येथील युवा उद्योजक श्री संतोषशेठ गोविंदराव चेमटे यांची नवरात्री उत्सवानिमित्त नऊ दिवस मंडळाला अनेक प्रकारचे सहकार्य नियोजन असते व भरघोस बक्षिसांची मदत होते यापुढेही त्यांच्या मदतीचा हात मंडळाला राहणार आहे असेही संतोषशेठ चेमटे यांनी सांगितले . त्या वेळेस भाळवणी येथील श्री बबलूशेठ  रोहोकले, श्री संदीपशेठ कपाळे,  श्री राजेंद्रशेठ च...

श्री क्षेत्र स्वामी समर्थ देवस्थान माळकूप येथे १५ लक्ष रु. सभामंडपाचे भूमीपुजन समारंभ श्री. विश्वनाथ कोरडे यांच्या हस्ते संप्पन.

📌 पारनेर ( प्रतिनीधी ) माळकूप - पारनेर न्यूज  🛑 श्री क्षेत्र स्वामी समर्थ देवस्थान माळकूप येथे १५ लक्ष रु. सभामंडपाचे भूमिपूजन समारंभ संपन्न . ✍️ पारनेर तालुक्यातील माळकूप येथे लाखो स्वामीभक्तांचे श्रद्धास्थान प्रति अक्कलकोट असलेले स्वामी समर्थ देवस्थान येथे गुरुवार दिनांक १० / १० / २०२४ रोजी येथे नवीन सभामंडपाचे भूमिपूजन भाजपाचे प्रदेश कार्यकारणी अध्यक्ष श्री विश्वनाथदादा कोरडे यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख श्री बंडूशेठ रोहोकले ,जिल्हा भाजप कार्यकारणी सदस्य श्री संभाजी आमले ,श्री दीपक रोहोकले ,श्री पोपट लोंढे , जगदीश आंबेडकर, श्री अरुणराव ठाणगे व स्वामी समर्थ देवस्थान येथील माजी सरपंच श्री बाळासाहेब शिंदे ,श्री संभाजी नाबगे ,श्री बबन शिंदे गुरुजी ,श्री भास्कर काळे  आदी मान्यवर व हजारो स्वामीभक्त उपस्थित होते. 🛑  जि प सार्वजनिक बांधकाम विभाग पारनेर यांच्याकडून २५१५ - १२३८ ग्रामविकास निधी योजनेतून १५ लक्ष रु. चा निधी सभामंडपासाठी मिळालेला आहे .यापुढील काळातही असेच भरीव योगदान शासनाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न राहील असेही ते म्हणा...

सर्व सेवा आणि सुविधायुक्त रुग्णवाहिका अपघातग्रस्तांसाठी उपलब्ध किरण गुंजाळ यांची माहिती

सर्व सेवा आणि सुविधायुक्त रुग्णवाहिका अपघातग्रस्तांसाठी उपलब्द किरण गुंजाळ यांची माहिती  📍पारनेर न्यूज  ✍️ शिवशंकर शिंदे - संपादक  🔶 पारनेर तालुका येथे अहिल्यानगर ते कर्जुले हर्या इथपर्यंत शतायु हॉस्पिटल व किरण बाबासाहेब गुंजाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने के.जी.ॲम्बुलन्स सर्विस उपलब्ध केलेली आहे,  या ॲम्बुलन्समध्ये सुविधा व्हेंटिलेटर मॉनिटर सक्षम मशीन डीफीबलेटर एक अनुभवी डॉक्टर तसेच एक अनुभवी नर्सिंग स्टाफ अशा प्रकारचे सुविधा केलेली आहे किरण गुंजाळ हे शिवसेना युवा सेना जिल्हा उपप्रमुख शिंदे गट म्हणून कार्यरत आहेत, त्यांसोबत माळकुप येथील रवींद्र खोडदे हे यांच्या सोबतीला असणार आहेत अशी माहिती किरण गुंजाळ यांनी दिलेली आहे हे ॲम्बुलन्स ढवळपुरी फाटा येथे दररोज उपलब्ध आहे,  किरण गुंजाळ यांनी संपर्कासाठी हा नंबर दिलेला आहे, 📱 8484848339  या वरील नंबर वरती नगर कल्याण हायवे अहिल्यानगर ते कर्जुले हर्या इथे कुठे ही अपघात झाल्यास या वरील नंबर वरती तात्काळ संपर्क करण्यात यावा अशी माहिती किरण गुंजाळ यांनी दिलेली आहे .