Skip to main content

कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर राहुलने मिळवले यश : सभापती काशिनाथ दाते सर

📌 पारनेर प्रतिनीधी 
पारनेर न्यूज एक्सप्रेस 
कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर राहूलने मिळवले यश :  सभापती काशिनाथ दाते सर 
जामगाव ता. पारनेर येथील राहुल गोवर्धन बांगर यांची सन २०२२ मध्ये लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत यश मिळवुन पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल नागरी सन्मान केला यावेळी सभापती काशिनाथ दाते सर बोलत होते. भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, मनसे तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी किसन आप्पा भुजबळ, बबलू शेठ रोहकले, पारनेर ग्रामीण पतसंस्था जेष्ठ संचालक बाळासाहेब सोबले, मा. चेअरमन एकनाथ धुरपते, ह भ प योगेश महारा शिंदे यावेळी प्रमुख उपस्थितीत होते. 

यावेळी बोलताना सभापती दाते म्हणाले कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर राहुलने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. राहुलचे यश इतरांसाठी प्रेरणादायी आहे. तेरा वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर मिळवलेले हे यश निश्चितपणे प्रेरणादायी आहे. त्याच्या या यशात आई श्रीमती सविता बांगर यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. त्याचबरोबर पप्पू शेठ बांगर व त्यांचा संपूर्ण बांगर परिवार नातेवाईक ग्रामस्थ यांचेही योगदान नाकारता येणार नाही. जामगाव येथील शेतकरी कुटुंबातील राहुल आज फार मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकला ही गावच्या नव्हे तर तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. यापूर्वीही या गावातून धुरपते आणि सोबले कुटुंबातील उच्च पदावर नियुक्त झालेल्या युवकांचा सन्मान करण्याचे भाग्य मला मिळाले आहे. राहुलच्या यशाने जामगाव च्या गौरवशाली वैभवात भर घातली, यापुढे आपल्या कारकिर्दीत सर्वसामान्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम त्याने करावे, यापुढे त्याला असेच यश मिळत राहो, आई चुलते आपला परिवार यांचे नाव उज्वल करावे अशी सदिच्छा आणि शुभेच्छा यावेळी सभापती दाते यांनी दिली.  बाळासाहेब माळी, सुभाष दुधाडे, किसन भुजबळ, बबलू रोहकले, ह भ प योगेश शिंदे यांनीही आपले मनोगतात राहुल यांस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

यावेळी सभापती दाते सरांच्या हस्ते राहुलचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. तसेच त्याची आई श्रीमती सविता गोवर्धन बांगर यांच्यासह संपूर्ण बांगर परिवाराचा सन्मान करण्यात आला. गावातून सवाद्य मिरवणूक काढून बांगरवाडी येथे हा सन्मान सोहळा संपूर्ण बांगर परिवाराने "याची देही याचा डोळा अनुभवला" परिसरातील विविध गावच्या प्रतिनिधींनीही त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी संपूर्ण बांगर परिवार तसेच यावेळी शंकर महांडुळे, सेवा सोसायटीचे चेअरमन नवनाथ बांगर, व्हा चेअरमन विष्णुपंत नाईक, सोसायटी सचिव विनायक रोहकले, सर्व आजी-माजी पदाधिकारी, मा. सरपंच राजेंद्र नाईक, ग्रामपंचायत जामगाव चे सर्व माझी आजी-माजी सदस्य, बांगरवाडी, जामगाव ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबजी बांगर यांनी केले, सूत्रसंचालन नंदू शिंदे यांनी केले तर युवा नेते पप्पू बांगर यांनी सर्वांचे आभार मानले.

🔸माझे पीएसआय होण्याचे स्वप्न होते, बऱ्याच वेळा अपयश आले तरी पण खचून न जाता अभ्यासात सातत्य ठेवले, माझ्या आईची मला मोलाची साथ होती, माझे चुलते विजय बांगर, आजोबा नाथु बांगर, चुलत भाऊ पप्पू बांगर व इतर मित्रांनी मला आर्थिक मदत केली. पुण्यातील रयत प्रबोधनीचे उमेश कुदने सर यांनी मार्गदर्शन केले. मला यश मिळाले या सर्वांमुळे : 

राहुल बांगर, पोलीस उपनिरीक्षक

शिवशंकर शिंदे 
📌 संपादक - पारनेर न्यूज एक्सप्रेस 
पत्रकार - मायभूमी व दिव्य जनलोक 
मो नं - 9764972647

Comments

Popular posts from this blog

शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त घट सजावटमध्ये शारदा राजेंद्र रोहोकले यांनी प्रथम क्रमांक मिळविला

🛑 पारनेर - ( प्रतिनिधी )  भाळवणी - पारनेर न्यूज एक्सप्रेस  🔶 शारदीय नवरात्री उत्सवनिमित्त घट सजावट मध्ये शारदा राजेंद्र रोहोकले यांनी प्रथम क्रमांक मिळविला. ✍️ पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे श्री विठ्ठल रुक्मिणी चॅरीटेबल ट्रस्ट भाळवणी स्व.नानापाटील रोहोकले युवा ग्रामविकास प्रतिष्ठान व दोस्ती युवा ग्रुप आयोजित नवरात्री उत्सवानिमित्त घट सजावट मध्ये भाळवणी येथील युवा उद्योजक श्री संतोषशेठ गोविंदराव चेमटे यांची बहीण शारदा राजेंद्र रोहोकले यांनी प्रथम क्रमांक पटकाविल्या बद्दल अहिल्यानगरचे लोकप्रिय खासदार श्री निलेशजी लंके यांच्या पत्नी व जिल्हा परिषद सदस्या सौ राणीताई लंके यांच्या हस्ते पिठाची गिरणी बक्षीस म्हणून देण्यात आली . भाळवणी येथील युवा उद्योजक श्री संतोषशेठ गोविंदराव चेमटे यांची नवरात्री उत्सवानिमित्त नऊ दिवस मंडळाला अनेक प्रकारचे सहकार्य नियोजन असते व भरघोस बक्षिसांची मदत होते यापुढेही त्यांच्या मदतीचा हात मंडळाला राहणार आहे असेही संतोषशेठ चेमटे यांनी सांगितले . त्या वेळेस भाळवणी येथील श्री बबलूशेठ  रोहोकले, श्री संदीपशेठ कपाळे,  श्री राजेंद्रशेठ च...

श्री क्षेत्र स्वामी समर्थ देवस्थान माळकूप येथे १५ लक्ष रु. सभामंडपाचे भूमीपुजन समारंभ श्री. विश्वनाथ कोरडे यांच्या हस्ते संप्पन.

📌 पारनेर ( प्रतिनीधी ) माळकूप - पारनेर न्यूज  🛑 श्री क्षेत्र स्वामी समर्थ देवस्थान माळकूप येथे १५ लक्ष रु. सभामंडपाचे भूमिपूजन समारंभ संपन्न . ✍️ पारनेर तालुक्यातील माळकूप येथे लाखो स्वामीभक्तांचे श्रद्धास्थान प्रति अक्कलकोट असलेले स्वामी समर्थ देवस्थान येथे गुरुवार दिनांक १० / १० / २०२४ रोजी येथे नवीन सभामंडपाचे भूमिपूजन भाजपाचे प्रदेश कार्यकारणी अध्यक्ष श्री विश्वनाथदादा कोरडे यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख श्री बंडूशेठ रोहोकले ,जिल्हा भाजप कार्यकारणी सदस्य श्री संभाजी आमले ,श्री दीपक रोहोकले ,श्री पोपट लोंढे , जगदीश आंबेडकर, श्री अरुणराव ठाणगे व स्वामी समर्थ देवस्थान येथील माजी सरपंच श्री बाळासाहेब शिंदे ,श्री संभाजी नाबगे ,श्री बबन शिंदे गुरुजी ,श्री भास्कर काळे  आदी मान्यवर व हजारो स्वामीभक्त उपस्थित होते. 🛑  जि प सार्वजनिक बांधकाम विभाग पारनेर यांच्याकडून २५१५ - १२३८ ग्रामविकास निधी योजनेतून १५ लक्ष रु. चा निधी सभामंडपासाठी मिळालेला आहे .यापुढील काळातही असेच भरीव योगदान शासनाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न राहील असेही ते म्हणा...

सर्व सेवा आणि सुविधायुक्त रुग्णवाहिका अपघातग्रस्तांसाठी उपलब्ध किरण गुंजाळ यांची माहिती

सर्व सेवा आणि सुविधायुक्त रुग्णवाहिका अपघातग्रस्तांसाठी उपलब्द किरण गुंजाळ यांची माहिती  📍पारनेर न्यूज  ✍️ शिवशंकर शिंदे - संपादक  🔶 पारनेर तालुका येथे अहिल्यानगर ते कर्जुले हर्या इथपर्यंत शतायु हॉस्पिटल व किरण बाबासाहेब गुंजाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने के.जी.ॲम्बुलन्स सर्विस उपलब्ध केलेली आहे,  या ॲम्बुलन्समध्ये सुविधा व्हेंटिलेटर मॉनिटर सक्षम मशीन डीफीबलेटर एक अनुभवी डॉक्टर तसेच एक अनुभवी नर्सिंग स्टाफ अशा प्रकारचे सुविधा केलेली आहे किरण गुंजाळ हे शिवसेना युवा सेना जिल्हा उपप्रमुख शिंदे गट म्हणून कार्यरत आहेत, त्यांसोबत माळकुप येथील रवींद्र खोडदे हे यांच्या सोबतीला असणार आहेत अशी माहिती किरण गुंजाळ यांनी दिलेली आहे हे ॲम्बुलन्स ढवळपुरी फाटा येथे दररोज उपलब्ध आहे,  किरण गुंजाळ यांनी संपर्कासाठी हा नंबर दिलेला आहे, 📱 8484848339  या वरील नंबर वरती नगर कल्याण हायवे अहिल्यानगर ते कर्जुले हर्या इथे कुठे ही अपघात झाल्यास या वरील नंबर वरती तात्काळ संपर्क करण्यात यावा अशी माहिती किरण गुंजाळ यांनी दिलेली आहे .